आमच्याबद्दल

सन १९८३ मध्ये डॉ. एस. एस. कलबाग यांनी पुण्यापासून ७० कि.मी. वर असलेल्या पाबळ या खेडेगावामध्ये विज्ञान आश्रमाची स्थापना केली. ‘कामातून शिक्षण’ ये त्यांचे अभिनव तत्वज्ञान. यांच्याकडे फॅब्रिकेशन, मोटर रिवाइंडिंग, अन्न प्रक्रिया, कुकुटपालन, शेळी पालन, पॉलीहाऊस, डिजिटल फॅब्रिकेशन – 3 डी प्रिंटिंग, लेजर कटींग, प्लाजमा कटींग, सोलार संदर्भात व्यवसाय, आणि या सारखे अनेक व्यवसाय आम्ही आमच्या विद्यार्थ्यांन बरोबर करतो. पुढे हे विद्यार्थी त्यांचा स्वतचा व्यवसाय त्यांचा गावी जाऊन करतात. तुम्ही सुद्धा या व्यवसायांमद्धे सहभागी होऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता.

स्टार्टअप सारथी (Startup Sarathi) हा विज्ञान आश्रम या संस्थेचा एक उपक्रम असून आम्ही यामधून युवकांना तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी फक्त प्रशिक्षणच नाही तर त्या नंतर लागणारे सर्व आवश्यक सहकार्य करत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत ४००० पेक्षा जास्त यशस्वी उद्योजक विज्ञान आश्रमाने घडविले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर भेट द्या

Supported By

स्टार्टअप सारथीची मदत कशी मिळवायची?

कृपया आम्हाला startupsarathi.va@gmail.com वर ‘स्टार्टअप सारथी’ या विषयासह ई-मेल लिहा किंवा पुढील लिंक मध्ये आपली माहिती भरा

×